अपडेट्स

वेबसाईटवर नवनवीन माहिती अपडेट होत आहे....

Sunday, May 17, 2020

१लीसाठी ज्ञानरचनावादी उपक्रम | १०० दिवसात मुले वाचायला कशी शिकतात ?

१लीसाठी ज्ञानरचनावादी उपक्रम यादी - 


(१) चित्रांची पुस्तके पाहून चित्रवर्णन करणे.
(२) चित्रगप्पा मारणे.
(३) ठरवुन गप्पा मारणे.
(४) न ठरवता गप्पा मारणे.
(५) वाचनासाठी चित्रशब्द वाचन,फक्त चित्रवाचन व नंतर शब्दवाचन
पाच चित्रकार्ड संच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.
(६) चित्र-शब्द जोड्या लावणे.
 मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचतात.

भाषा उपक्रम-

(१) शब्दचक्रवाचन घेणे.मनाचा शब्द घेउन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
(२) शब्दभेंड्या खेळ घेणे.
(३) वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
(१) धुळपाटीवर लेखन करणे.
(२) मित्राच्या पाठीवर अक्षर गिरविणे.
(३) समान अक्षर जोड्या लावणे.
(४) अक्षर आगगाडी बनवणे.
(५) पाहुणा अक्षर ओळखणे.
(६) चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
(७) बाराखडीवाचन करणे.
(८) बाराखडी तक्ते वाचन करणे.
(९) स्वरचिन्हयुक्त ५०० शब्दांचे वाचन.
(१०) थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
(११) कथालेखन करणे.
(१२) कवितालेखन करणे.
(१३) चिठठीलेखन करणे.
(१४) संवादलेखन करणे.
(१५) मराठी शब्दकोशातील शब्द शोधा.

गणित उपक्रम-

(१) खडे,वस्तू मोजुन घेणे.
(२) मणी,काड्या मोजणे.
(३) आपले अवयव मोजणे.
(४) संख्याकार्ड पाहुन वस्तु मांडणे.
(५) कार्ड घेवून गोलात फिरणे.
(६) आगगाडी तयार करून घेणे.
(७) संख्या बोटावर दाखवणे.
(८) मणीमाळेवर संख्या दाखवणे.
(९) अंकाची गोष्ट सांगणे.
(१०) शाब्दीक व अंकी बेरीज करणे.
(११) उभी,आडवी बेरीज करणे.
(१२) चौकटीची उदाहरण सोडवणे.
(१३) बेरीजगाडी तयार करणे.
(१४) अंकांपुढे वस्तु मांडणे.
(१५) गठ्ठे सुट्टे करणे.
(१६) मणीमाळेवर संख्यावाचन करून घेणे.

No comments:

Post a Comment

Popular